आजमगढ़

शंकर महाराज प्रगट दिन निमित्त कलार्पण संगीत विद्यालय धनकवडी पुणे ची भक्ती संगीत संध्या 

 

नुकताच दिनांक ३०/१०/२०२५, गुरुवार रोजी

सदगुरु श्री शंकर महाराज प्रगट दिन निमित्त गणेश ऑटो धनकवडी पुणे यांच्या वतीने “संगीत सभेचे”आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र असलेला “राम कृष्ण हरी” ह्या मंत्राने प्रसिद्ध गायक- सुरमणी, पंडित सुधाकर तळणीकर यांच्या आवाजाने झाली.त्या नंतर बालकलाकर स्वरांश तळणीकर गणेश स्तुती आणि कौशिकी तळणीकर हिने दत्त दिगंबर दैवत माझे हे भक्तिगीत गाऊन कार्यक्रमाचे आकर्षण प्राप्त केले.या नंतर प्रसिद्ध संगीतकार गायक श्री मंदार तळणीकर यांच्या आवाजात

परब्रम्ह निष्काम तो हा, त्या त्रिशूला सम भेदक नजर,

अक्कलकोटी गुरु महाराज इत्यादी भक्ती सादर करून मालकंस रागाचा देखील वेगळा स्वराभास रसिकांना दाखवला आणि रसिकांना खिळवून ठेवले. सुरमणी सुधाकर तळणीकर यांनी देव माझा,माझे माहेर पंढरी,आली आली पालखी आली,माता कालिका,तराना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

गायक विठ्ठल कुमावत यांनी शंकर बाबा,सावळे सुंदर ह्या भावस्पर्शी सुंदर श्रवणीय अशा रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.

कार्यक्रमाला तेवढीच समर्पक तबला साथ हर्षवर्धन गांवकर आणि पखवाज साथ संतोष पवार, तर टाळ साथ धनंजय सांबरे,प्रतीक भालेराव यांनी केली. प्रसंगी सद्गुरू श्री शंकर महाराज प्रगटदिन सोहळा गणेश ऑटो धनकवडी पुणे , आयोजकांचे आभार मानण्यात आले.आणि सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी अनेक भाविक श्रोते कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

AZMI DESK

Related Articles

Back to top button
WhatsApp Join Group!